Sat, Sep 22, 2018 18:26होमपेज › Kolhapur › ‘गोकुळ’ संचालकपदी अनिलराव यादव

‘गोकुळ’ संचालकपदी अनिलराव यादव

Published On: Jun 20 2018 1:33AM | Last Updated: Jun 20 2018 1:20AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर (गोकुळ) शासन नियुक्‍त संचालक म्हणून अनिलराव यादव यांची मंगळवारी नियुक्‍ती करण्यात आली. यादव हे शिरोळ तालुक्यातील असून ते सहकार क्षेत्रात सक्रिय आहेत.  ज्या सहकारी संस्थांना राज्य सरकारने भाग भांडवल दिले आहे. अशा संस्थांमध्ये सहायक निबंधक व त्यावरील दर्जाचा अधिकारी किंवा सहकार क्षेत्रातील अनुभव आहे, अशा व्यक्‍तीची संचालक म्हणून नियुक्‍ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.