Mon, Jul 22, 2019 13:13होमपेज › Kolhapur › कसा काय कोल्हापूर!

कसा काय कोल्हापूर!

Published On: Apr 08 2018 2:02AM | Last Updated: Apr 08 2018 11:16AMकोल्हापूर : प्रख्यात बॉलीवूड अभिनेता अनिल कपूर याने ‘कसा काय कोल्हापूर!’ अशा आपुलकीच्या भावनेने ट्विटरवरून कोल्हापूरकरांना/ करवीरवासीयांना साद घातली आहे. मलबार गोल्डस् अँड डायमंडस् कॉर्नर उद्घाटनासाठी अनिल कपूर रविवारी कोल्हापुरात येत आहे. आपल्या कोल्हापूर दौर्‍याची खबर त्याने खास ट्विट करून दिली आहे.

@Anillkapoor या आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून अनिल कपूरने शनिवारी ट्विट केले. हे ट्विट असे : कसा काय कोल्हापूर! मी उद्या (8 एप्रिल) तुमच्या सुंदर कोल्हापूर शहरात येत आहे. मी तुमच्यासाठी घेऊन येतोय मलबार गोल्डस् अँड डायमंडस् कॉर्नर या ज्वेलरी ब्रँडचे नवे, चकचकीत शोरूम. तेव्हा उद्या भेटुया, व्हीनस कॉर्नरला, सकाळी 11:30 वाजता!

Tags : Kolhapur, Anil Kapoor,  Kolhapur