Sun, Jan 20, 2019 00:04होमपेज › Kolhapur › अनिकेत जाधव खेळणार स्पेनमध्ये

अनिकेत जाधव खेळणार स्पेनमध्ये

Published On: Jul 21 2018 1:35AM | Last Updated: Jul 21 2018 1:31AMकोल्हापूर : प्रतिनिधी

स्पेनमध्ये होणार्‍या 20 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणार्‍या भारतीय संघात कोल्हापूरचा फुटबॉलपटू अनिकेत जाधवची निवड झाली आहे. हा संघ आज (शनिवारी) स्पेनकडे रवाना होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ अर्जेंटिना, व्हेनेझुएला आणि मॉरिटानिया संघाविरुद्ध खेळेल. या स्पर्धेत स्थानिक मुर्सिया संघही खेळणार आहे.

या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या 24 सदस्यीय भारतीय संघात अनिकेतचा फॉरवर्ड म्हणून समावेश करण्यात आला आहे.