Fri, Jul 03, 2020 03:14होमपेज › Kolhapur › महिलांमध्ये रक्ताची कमतरता

महिलांमध्ये रक्ताची कमतरता

Last Updated: Jun 06 2020 1:28AM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा 

शरीरात रक्ताची कमतरता ही समस्या विशेषतः महिलांमध्ये अधिक जाणवते. खाण्यापिण्यातील हलगर्जीपणामुळे हिमोग्लोबीनची कमतरता निर्माण होऊन शरीरात अशक्तपणा येतो. महिलांमधील या वाढत्या समस्येचे लक्ष वेधत दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्या वतीने महिलांमधील रक्ताची कमतरता या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 शनिवारी (दि. 6) सायंकाळी 5 वाजता फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून रक्ताच्या कमतरतेमुळे होणारे दुष्परिणाम, आहार व उपचार याबाबत डॉ. संदीप नेमाणी मार्गदर्शन करणार आहेत. 
कार्यक्रमादरम्यान हिमोग्लोबीन कमी असल्याची लक्षणे कशी ओळखावीत, योग्य आहार घेऊन सहजपणे हिमोग्लोबीन कसे वाढवावे, अ‍ॅनिमियामध्ये आर्यनयुक्त आहार कसा गरजेचा आहे. अशा आवश्यक माहितीशिवाय महिलांच्या प्रश्नांची उत्तरे दिली जाणार आहेत. याकरिता फेसबूकवर र्झीवहरीळघर्रीीीींळ लेपपशलींज्ञेश्रहर्रिीी सर्च करा आणि लाईक करा किंवा हीींिीं://ुुु.षरलशलेेज्ञ.लेा/र्सीेीिी/650188125423230/?ीशष=ीहरीश वर लॉगईन करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8483926989, 9096853977. कस्तुरी क्लबच्या कार्यक्रमाचे व्हिडीओ तुम्हाला यू ट्यूबवर र्झीवहरीळ र्एींशपीीं येथे पाहता येणार आहेत.