Thu, Jun 27, 2019 02:19होमपेज › Kolhapur › प्राचीन पाणीसाठे, जलस्रोत दुर्लक्षित

प्राचीन पाणीसाठे, जलस्रोत दुर्लक्षित

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

राशिवडे : प्रतिनिधी

 जल है, तो कल है ही नवी म्हण आता केवळ पाण्याच्या टंचाईमुळे वापरात आली आहे. आपल्या पूर्वजांनी त्यांच्या शहाणपणाच्या अथवा अनुभवाच्या जोरावर निर्माण केलेली पाणीव्यवस्था म्हणजे सार्वजनिक विहिरी, आड, बावी होय. मात्र धरणे, तलावांच्या वाढत्या संख्येमुळे या जुन्या पाणीव्यवस्थेकडे दुर्लक्षच झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे  एक हजारांहून अधिक सार्वजनिक विहिरी कचर्‍याखाली झाकोळल्या आहेत तर तीनशेच्या आसपास विहिरीतीलच पाणी पिण्यास योग्य राहिले आहे.

अलीकडची शंभरभर  वर्षे  वगळता त्याआधी गावागावांमध्ये आपापली पाणीव्यवस्था होती.आपल्या पूर्वजांनी पारंपरिक शहाणपणाच्या जोरावर सगळ्यांची तहान भागविली होती. राज्यात सुमारे पंधरा हजार तर कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे साडेतेराशेच्या आसपास सार्वजनिक विहिरी, आड अस्तित्वात आहेत. अलीकडच्या पन्‍नास-साठ वर्षांमध्ये राज्यात नवीन धरणे, तलावांची निर्मिती झाली. साहजिकच मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होऊ लागला. त्यामुळेच हळूहळू या जुन्या शाश्‍वत  पाणीसाठ्यांकडे दुर्लक्ष होऊ लागले.

जिल्ह्यामध्ये फक्‍त 301 सार्वजनिक विहिरींचे पाणी पिण्यास योग्य आहे तर उर्वरित विहिरी कचर्‍याने भरलेल्या आहेत, अथवा पाणी न वापरल्याने या विहिरींना दुर्गंधी सुटली आहे.प्रामुख्याने उर्वरित आड किंवा  विहिरींची स्वच्छता करणे गरजेचे असताना केवळ ग्रामस्थांच्या दुर्लक्षामुळे या विहिरी चक्‍क कचर्‍याच्या ढिगाखालीच दबल्या गेल्या आहेत.

 Tags : Kolhapur, Kolhapur News, Ancient, waterways, water sources, ignored


  •