Wed, Apr 24, 2019 07:31होमपेज › Kolhapur › पर्यायी पुलाचे काम रखडणार नाही

पर्यायी पुलाचे काम रखडणार नाही

Published On: Jul 12 2018 1:41AM | Last Updated: Jul 12 2018 12:14AMकोल्हापूर : प्रतिनिधी

अधिकार्‍यांच्या वादामुळे पंचगंगेवरील पर्यायी पुलाचे काम रखडणार नाही. याबाबत तातडीने वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.  पर्यायी पुलाचे काम रखडले आहे. त्याकरिता आवश्यक डिझाईन अद्याप अंतिम झालेले नाही. याबाबत विचारता डॉ. म्हैसेकर म्हणाले, पर्यायी पुलाच्या बांधकामाबाबत पुरातत्त्वचा अडसर होता. तो दूर झाला आहे. पुलाच्या पायासाठी करण्यात येणार्‍या डिझाईनबाबत अधिकार्‍यांत समन्वय नाही.

याबाबत काही वाद असल्याचीही माहिती आहे. मात्र, सध्या त्याची तपशीलवार माहिती आपल्याला नाही. याबाबत पुण्यात गेल्यानंतर गुरुवारी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा केली जाईल आणि तत्काळ काम सुरू होईल, यादृष्टीने निर्णय घेण्याबाबत संबंधितांना सूचना केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, आजही काम बंद राहिले. जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून पंचगंगेच्या पाणी पातळीतही वाढ होत आहे. पाणी पातळीत वाढ होत राहिली, तर उद्यापासून काम आणखी काही दिवस बंद राहण्याची शक्यता आहे.