Wed, Feb 20, 2019 12:47होमपेज › Kolhapur › किरणोत्सव उद्यापासून

किरणोत्सव उद्यापासून

Published On: Jan 30 2018 1:51AM | Last Updated: Jan 29 2018 11:29PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

बुधवार, दि. 31 जानेवारी ते दि. 2 फेब्रुवारी कालावधीत करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचा उत्तरायणातील किरणोत्सव होत आहे. किरणोत्सव मार्गातील अडथळे, मंदिरातील आर्द्रता आणि धुलिकणांचा होणारा परिणाम, यामुळे गेली अनेक वर्षे किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होऊ शकत नाही. यासाठी किरणोत्सवापूर्वी अभ्यास सुरू करण्यात आला आहे. आजही मंदिरात किरणांची तीव्रता मोजण्यात आली. 

किरणोत्सवादरम्यान तीन दिवस भाविकांना एक तासासाठी मंदिरात प्रवेश बंदी केली जाणार आहे. भाविकांची सोय व्हावी, यासाठी देवस्थान समिती कार्यालयाशेजारी व नगारखान्यापुढे अशा दोन ठिकाणी एलईडी स्क्रीन लावून भाविकांना किरणोत्सव लाईव्ह पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय अभ्यास समितीमार्फतही अभ्यास सुरू राहणार आहे.