Thu, Feb 21, 2019 09:35होमपेज › Kolhapur › अवजड वाहतुकीला पर्यायी मार्ग

अवजड वाहतुकीला पर्यायी मार्ग

Published On: Mar 24 2018 1:48AM | Last Updated: Mar 23 2018 11:55PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

शहरातील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांना शहर वाहतूक शाखेने पर्यायी मार्ग सुचविले आहेत. धान्य, भाजीपाला, बांधकाम साहित्याचे ट्रक यापुढे रिंगरोडवरून मार्गस्थ होण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. 

गारगोटी भुदरगडकडून येणारी वाहने कळंबा ते फुलेवाडी रिंगरोडचा अवलंब करू शकतील. कागल मार्गे येणारी अवजड वाहने सायबर चौक ते संभाजीनगर मार्गे पुढे जातील. शिवाजी पुलावरील वाहतुकीवर बंदी असल्याने रत्नागिरीकडून येणार्‍या वाहनांनी शियेमार्गे राष्ट्रीय महामार्गावरून कसबा बावडामार्गे शहरात येतील. शिरोलीकडून येणारी वाहने ताराराणी चौक, टेंबलाई उड्डाणपूल यामार्गे जातील. अवजड वाहन चालकांनी या मार्गांचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेतर्फे केले आहे.

लक्ष्मीपुरी धान्य लाईनला येणारी वाहने दुपारी 12 ते 4 या वेळेतच शहरात येऊन पुन्हा बाहेर पडतील. याव्यतिरिक्‍त अवजड वाहने शहरात दिसल्यास तत्काळ दंडात्मक कारवाईचे आदेश दिले आहेत. लक्ष्मीपुरी धान्य मार्केट 15 मेपर्यंत टेंबलाईवाडीला स्थलांतरित करण्याच्या हालचाली असून यासाठी व्यापार्‍यांनी सहकार्य करण्याचे आवाहन शहर वाहतूक शाखेने केले आहे.

Tags : Kolhapur, Kolhapur News,Alternative route, heavy road, City Traffic Control