Sat, Jul 20, 2019 15:33होमपेज › Kolhapur › पर्यायी शिवाजी पुलाचे आजपासून काम सुरू

पर्यायी शिवाजी पुलाचे आजपासून काम सुरू

Published On: Jun 07 2018 2:05AM | Last Updated: Jun 07 2018 1:29AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पंचगंगेवरील पर्यायी पुलाचे थांबवलेले काम गुरुवारपासून पुन्हा सुरू केले जाणार आहे. पुलासाठी आवश्यक कॉलम काढण्यासाठी खोदकाम केले जाणार आहे. सकाळी 11 च्या सुमारास या कामाला प्रारंभ होईल.पर्यायी पुलाच्या बांधकामाला पुरातत्त्व विभागाने नाहरकत दाखला देण्याचा निर्णय घेतला आहे. नवी दिल्लीत राष्ट्रीय स्मारके प्राधिकरणाच्या बैठकीत हा निर्णय झाला. या बैठकीचे इतिवृत्त बुधवारी राष्ट्रीय महामार्ग विभागाला प्राप्त झाले. प्राधिकरणाच्या अध्यक्षा प्रो.सुस्मिता पांडे, सदस्य सचिव नवनीत सोनी, कायम सदस्य ए.बी.शुक्‍ला, सतीश कुमार व सदस्य यु.के.साधव यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत कोल्हापूरच्या पंचगंगा नदीवरील पर्यायी पुलाच्या बांधकामाला नाहरकत देण्याच्या मुद्यावर चर्चा झाली. 

सार्वजनिक प्रकल्प या नावाखाली या बैठकीत सहा क्रमांकाचा हा मुद्दा होता. त्यावर चर्चा करताना सर्व सदस्यांनी ब्रम्हपुरी परिसरातील ‘पुरातत्त्व’च्या सरंक्षित जागेचा संयुक्त सर्व्हे झाला आहे. या सर्व्हेनूसार पर्यायी पुलाचे अंतर संरक्षित जागेपासून 127 मीटर इतके होत आहे. यामुळे या बांधकामासाठी नाहरकत देण्यास सर्व सदस्यांनी मंजुरी दिली.ना-हरकतचे पत्र क्षेत्रीय कार्यालयाने देण्याचे या बैठकीत सूचितकरण्यात आले. या बैठकीचे इतिवृत्त (मिनिट्स) आज राष्ट्रीय महामार्ग विभागाला प्राप्त झाले आहे. पुरातत्त्वच्या क्षेत्रीय कार्यालयाकडून नाहरकतचे पत्र येत्या तीन-चार दिवसांत मिळण्याची शक्यता आहे.दरम्यान, ‘पुरातत्त्व’ने बांधकामासाठी नाहरकत दिल्याने ठेकेदार एन. डी. लाड यांनी काम सुरू करण्याची तयारी केली आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजल्यापासून कॉलम काढण्यासाठी खोदकाम सुरू केले जाणार आहे..