होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : चंदगडमध्ये अखेर बाटली आडवी 

कोल्‍हापूर : चंदगडमध्ये अखेर बाटली आडवी 

Published On: Jan 14 2018 9:34PM | Last Updated: Jan 14 2018 9:34PM

बुकमार्क करा
चंदगड: प्रतिनिधी

तुडये येथे रणरागिणींनी दारूबंदीविरोधात पुकारलेल्या लढ्याला अखेर यश आले. आज दिवसभर त्यासाठी मतदान प्रक्रिया झाली. १६०४ मतदाना पैकी १२४१ झाले. आडव्या बाटलीला १२४१ तर उभ्या बाटलीला केवळ १४८ मतदान झाले. मतदान झाल्यानंतर मतमोजणी रात्री ८ वाजता झाली. निवडणूक निर्णय अधिकारी नायब तहसीलदार डी. एम.  नांगरे यांनी निकाल घोषित केला व महिलांनी एकच जल्लोष केला. आनंदाने बेभान झालेल्या महिलांनी दारू दुकानाकडे धाव घेतली. व निषधांच्या घोषणा दिल्या. 

गावच्या मध्यभागी ४ दारूची दुकाने असल्यामुळे मधपिंचा महिलांना व विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. रोजच्या त्रासाला कंटाळून महिलांनी ४ महिन्यांपूर्वी ग्रामसभेत दारुदुकाने बंद करण्याचा ठराव पास करून घेतला. दरम्यान जिल्हाधिकारी यांनी मतदान घेण्याचे आदेश दिले होते.  आज सकाळी पहाटे पासून संपूर्ण महिलांनी उस्फूर्त मतदान केले. दारू दुकांदारांनीही  उभ्या बाटलीसाठी प्रचंड मेहनत घेतली मात्र, त्याला यश आले नाही. निकाल घोषित होताच महिलांनी व पुरुषांनीही गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी केली. विजयी झाल्याबद्दल गावातून मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये दारू बंदी कृती समितीच्या अध्यक्ष शारदा बसर्कट्टी, शिंदु हुलजी, वैशाली पाटील, अनिता पाटील,  चांगुणा मोहिते, रेणुका हुलजी आदी महिलांनी परिश्रम घेतले. आज दिवसभर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच राज्य उत्पादन शुल्क चे अधिकारीही उपस्थित होते.