Mon, Mar 25, 2019 04:58
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › आजरा नगरपंचायत निवडणुकीचा बिगुल

आजरा नगरपंचायत निवडणुकीचा बिगुल

Published On: Mar 06 2018 12:38AM | Last Updated: Mar 06 2018 12:34AMआजरा : प्रतिनिधी

राज्य निवडणूक आयोगाने आजरा नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम सोमवारी जाहीर केला. 9 मार्चपासून प्रत्यक्ष कार्यक्रमास प्रारंभ होणार असून, 6 एप्रिलला मतदान आहे. नगरपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजल्याने शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी 12 ते 19 मार्चपर्यंत आहे. अर्ज छाननी 20 रोजी करण्यात येणार आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत 26 मार्चपर्यंत आहे. 6 एप्रिल रोजी मतदान होणार असून, 7 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे.

ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर प्रथमच निवडणूक प्रक्रिया पार पडत असल्याने शहरवासीयांना प्रचंड उत्सुकता लागून आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे. नेतेमंडळींच्या वरिष्ठ पातळीवरून जोडण्या सुरू झाल्या आहेत. गतवेळी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याच्या उद्देशाने इच्छा असूनही ज्या मंडळींना निवडणूक रिंगणाबाहेर राहावे लागले ती मंडळी यावेळी जोमाने कामाला लागली आहे.

निवडणूक कार्यक्रमाबरोबरच आचारसंहिताही सुरू झाली आहे. नगरसेवकपदाच्या 17 व नगराध्यक्षपदाच्या एका जागेसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.