Sat, Jul 20, 2019 15:08होमपेज › Kolhapur › इस्रोभेट निबंध स्पर्धेत १२ विद्यार्थी पात्र

इस्रोभेट निबंध स्पर्धेत १२ विद्यार्थी पात्र

Published On: Dec 18 2017 2:34AM | Last Updated: Dec 17 2017 9:54PM

बुकमार्क करा

आजरा ः प्रतिनिधी 

जिल्हा परिषदेच्या वतीने पाचवी ते आठवी इयत्तामधील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी बेंगळुरू येथील इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) ला भेट देण्यासाठी जिल्ह्यातून 48 विद्यार्थी निवडण्यात येणार असून या पार्श्‍वभूमीवर आजरा येथे पार पडलेल्या निबंध स्पर्धेमध्ये एकूण 12 विद्यार्थी प्राथमिक फेरीत उत्तीर्ण झाले आहेत.

लवकरच याबाबतची अ‍ॅक्टिव्हिटी बेस्ट स्वरूपाची मुलाखत जिल्हास्तरावर घेण्यात येणार असून या मुलाखतीनंतर इस्रो भेटीकरिता दोन मुले व दोन मुली अशी चौघांची निवड करण्यात येणार आहे. लवकरच सदर मुलाखत होणार असून प्राथमिक स्तरावर निवड झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे ः सिद्धेश एकनाथ गुरव, सागर श्रीरंग कडाकणे, रसिका तानाजी पाटील, किर्ती आनंदा गेंगे, धनश्री मोहन भाईंगडे, धैर्यशील धनाजी देसाई, गीतांजली बाळू आडावकर, अपूर्वा युवराज कांबळे, अपूर्वा बाळू बागडी, स्नेहल अशोक देसाई, भाग्यश्री सुधाकर रेडेकर, ऋतुराज दिलीप कांबळे यांचा यामध्ये समावेश आहे असे गटशिक्षणाधिकारी टी. एल. मोळे यांनी सांगितले.