Mon, May 27, 2019 07:49होमपेज › Kolhapur › विमानतळ अडथळे; लवकरच बैठक

विमानतळ अडथळे; लवकरच बैठक

Published On: Aug 15 2018 1:23AM | Last Updated: Aug 15 2018 12:40AMकोल्हापूर : प्रतिनिधी

विमानतळे विस्तारीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षिततेच्या द‍ृष्टीने निश्‍चित केलेले अडथळे हटविण्याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. कोल्हापूर विमानतळावर मंगळवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विमानतळ सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

कोल्हापूर विमानतळ ‘अ‍ॅप्रोच फनेल’मध्ये असणार्‍या 186 अडथळ्यात काही टॉवर, कमानी, छोट्या टेकड्या आणि काही इमारतींचा समावेश आहे. हे अडथळे दूर करणे गरजेचे आहे. त्याबाबत पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. प्राधिकरणाचे राजेश अय्यर यांनी विमानतळ विस्तारीकरणाचे सादरीकरण केले.यावेळी आ. अमल महाडिक, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, प्राधिकरणाचे सरव्यवस्थापक (सिव्हिल) एस. के.व्यवहारे, कोल्हापूर विमानतळाच्या व्यवस्थापिका पूजा मूल, सल्लागार समितीचे सदस्य समीर शेठ यांच्यासह महावितरण, बीएसएनएल आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.