Mon, May 27, 2019 08:54होमपेज › Kolhapur › जिल्हा परिषदेतील अतिरिक्‍त 113 शिक्षक शाळेविनाच 

जिल्हा परिषदेतील अतिरिक्‍त 113 शिक्षक शाळेविनाच 

Published On: Jul 01 2018 1:52AM | Last Updated: Jun 30 2018 11:12PMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेतील अतिरिक्‍त ठरलेले अजूनही 113 शिक्षक शाळेविनाच आहेत. दरम्यान, बदलीच्या ऑर्डर आलेल्या 87 शिक्षकांनी बदलीच्या ठिकाणी हजर होऊ लागले आहेत. 

अतिरिक्‍त शिक्षकांच्या बदलीबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. यावर लवकरच निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांच्या केवळ 14 टक्के जागा रिक्‍त राहिल्या आहेत. हे प्रमाण अतिरिक्‍त शिक्षकांचा प्रश्‍न मार्गी लागल्यानंतर आणखी कमी होईल.

बदलीच्या ऑर्डर आलेल्या 87 शिक्षकांमध्ये आजरा तालुुक्यातील 2, भुदरगड 9, चंदगड 12, शाहूवाडी 38, राधनागरी 15, गगनबावडा 8, पन्हाळा 2 व शिरोळ तालुक्यातील एका शिक्षकाचा समावेश आहे. शाहूवाडी तालुक्यातील सर्वात अधिक शिक्षकांच्या जागा रिक्‍त होत्या.

शाळाविना राहिलेल्या 87 शिक्षकांपैकी 38 शिक्षकांची बदली शाहूवाडी तालुक्यात केल्यामुळे या तालुक्यातील रिक्‍त जागांचे प्रमाण आता खूप कमी झाले आहे. अतिरिक्‍त शिक्षकांच्या बदलीनंतर या तालुक्यातील एकही जागा रिक्‍त राहणार नाही, अशी अपेक्षा आहे.