Fri, Jul 03, 2020 01:14होमपेज › Kolhapur › गडहिंग्लज तालुक्यात नव्याने १४ रुग्णांची भर

गडहिंग्लज तालुक्यात नव्याने १४ रुग्णांची भर

Last Updated: May 28 2020 2:42PM

संग्रहित छायाचित्रगडहिंग्लज : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात सकाळी आलेल्या अहवालांमध्ये नवे २५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यात गडहिंग्लज तालुक्यातील तब्बल १४ जणांचा समावेश आहे. यामध्ये मुंगूरवाडीतील ५, यमेहट्टी ५, तर महागाव, बेळगुंदी, हसूरवाडी, कुमरी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. गेल्या दोन दिवसात तालुक्यात दोघा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून आज तब्बल १४ रुग्ण आढळल्याने तालुका हादरला आहे. हे सर्व रुग्ण मुंबईहुन गावी आलेले आहेत. हे सर्व आपापल्या गावी संस्थात्मक विलगीकरणात आहेत. 

गेल्या दोन दिवसात तालुक्यात दोघा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून आज तब्बल १४ रुग्ण आढळल्याने तालुका पुन्हा हादरला आहे. आता एकूण रुग्णसंख्या ३० झाली आहे. यामध्ये यमेहट्टी ८ (पैकी १ मयत), मुंगूरवाडी ५, तेरणी ४, कळविकट्टे, काळामवाडी, भडगाव, गिजवणे, महागाव, बेळगुंदी, हसूरवाडी, कुमरी, हनिमनाळ, सांबरे, तावरेवाडी, हडलगेत प्रत्येकी एक रुग्ण आहे. तर चन्नेकुप्पीतील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.