Wed, May 22, 2019 06:16होमपेज › Kolhapur › उत्तरपत्रिका गहाळप्रकरणी शिक्षिकेवर कारवाई होणार

उत्तरपत्रिका गहाळप्रकरणी शिक्षिकेवर कारवाई होणार

Published On: Apr 18 2018 1:42AM | Last Updated: Apr 17 2018 11:22PMकोल्हापूर : प्रतिनिधी

महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलमधून (एमएलजी) दहावीच्या माहिती-तंत्रज्ञान व संवाद (आयसीटी) विषयाच्या उत्तरपत्रिका गहाळ झाल्याप्रकरणी संबंधित शिक्षिकेवर महाराष्ट्र खासगी शाळा सेवा शर्ती अधिनियमानुसार कारवाई होणार आहे. कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाने मुख्याध्यापिकांनी सादर केलेला अहवाल राज्य शिक्षण मंडळास पाठविला आहे. 

दहावीच्या आयसीटी विषयाच्या नऊ उत्तरपत्रिका महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलमधून गहाळ झाल्या. याप्रकरणी मुख्याध्यापिका भूपाली शिंदे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. गहाळ उत्तरपत्रिकांची शोधमोहीम सुरू आहे. मात्र, अद्याप उत्तरपत्रिका सापडल्या नसल्याचे जुना राजवाडा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनिल गुजर यांनी सांगितले. 

विभागीय शिक्षण मंडळाच्या प्रभारी अध्यक्ष पुष्पलता पवार या प्रकरणाबाबत बोलताना म्हणाल्या, उत्तर गहाळप्रकरणी शाळेने पोलिसांत फिर्याद दिली आहे. मुख्याध्यापिकांकडून याबाबतचा अहवाल मागवून तो राज्य मंडळाला पाठविण्यात आला आहे. राज्य मंडळाच्या निर्देशानुसार संबंधित शिक्षिकेवर कारवाई करण्यात येईल. उत्तरपत्रिका न सापडल्यास संबंधित परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची विभागीय मंडळाकडून काळजी घेतली जाईल, असेही पवार म्हणाल्या. 

 

Tags : kolhapur, kolhapur news, missing paper, teacher, Action,