Wed, Nov 21, 2018 23:28होमपेज › Kolhapur › शिरोळमध्ये हातभट्टी अड्‍ड्यांवर कारवाई

शिरोळमध्ये हातभट्टी अड्‍ड्यांवर कारवाई

Published On: Jan 31 2018 8:50PM | Last Updated: Jan 31 2018 8:50PMकुरूंदवाड : प्रतिनिधी

शिरोळ तालुक्यातील दानवाड येथे हातभट्टीच्या दोन अड्ड्यांवर उत्‍पादन शुल्‍क विभागाने कारवाई केली. यात १ हजार लिटर दारु तसेच २१ हजार रुपयांचे हातभट्टीचे रसायन नष्‍ट करण्यात आले आहे. तसेच दारु तयार करण्यासाठीचे साहित्य जप्‍त केले.

दारूबंदी उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय उपायुक्त श्रीमती संगीता दरेकर यांच्या मार्गदर्शनाखालील उपअधीक्षक संजय पाटील विभागीय निरीक्षक लहू शिंदे,उपनिरीक्षक शिवाजी कोरे, सुभाष मांजरे, बलराम पाटील या पथकाने कारवाई केली.