Thu, Apr 25, 2019 03:25होमपेज › Kolhapur › फॅन्सी नंबरप्लेटवर कारवाई

फॅन्सी नंबरप्लेटवर कारवाई

Published On: Dec 15 2017 2:44AM | Last Updated: Dec 15 2017 2:19AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

शहरातील महाविद्यालये, वर्दीळीची ठिकाणे, प्रमुख चौकांत शहर वाहतूक शाखेच्या वतीने वाहनांची तपासणी करण्यात आली. फॅन्सी नंबरप्लेटविरोधात गुरुवारी धडक मोहीम राबविण्यात आली. 285 वाहनधारकांकडून 56 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत नाकाबंदीद्वारे चारचाकी वाहनांचीही तपासणी सुरू होती. 

शहर वाहतूक शाखेने गुरुवारपासून फॅन्सी नंबरप्लेट विरोधात कारवाई सुरू केली. याअंतर्गत शहरातील मुख्य मार्गांवर वाहनांची तपासणी करण्यात आली. फॅन्सी नंबरप्लेट, ट्रिपल सीट, भरधाव वाहने चालविणार्‍यांवर कारवाई करण्यात आली.  रात्री शहरात येणार्‍या मुख्य मार्गांवर वाहनांची तपासणी सुरू होती.  फॅन्सी नंबरप्लेटवर यापुढे कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी सांगितले.