Wed, Jul 17, 2019 20:47होमपेज › Kolhapur › प्रदूषणकारी घटकांवर कारवाई : कदम

प्रदूषणकारी घटकांवर कारवाई : कदम

Published On: Jul 03 2018 1:52AM | Last Updated: Jul 03 2018 1:10AMहुपरी : वार्ताहर

पंचगंगा नदी प्रदूषित करणार्‍या घटकांवर कडक करवाई केली जाईल, असे आश्‍वासन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिले. लोकांच्या जीवावर उठणार्‍या कंपन्या काय कामाच्या, असा संतप्त सवाल मंत्री कदम यांनी केला.

प्रदूषणामुळे अनेकांचे जीवन धोक्यात येऊ लागले आहेत. तरीदेखील शासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे नागरिकांना न्याय मिळावा यासाठी उपोषण करणार असल्याचा इशारा आमदार उल्हास पाटील यांनी दिला होता. याची दखल घेऊन मंत्री कदम यांनी सोमवारी इंगळी (ता. हातकणंगले) येथे पंचगंगा नदीत लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधून मिसळणार्‍या प्रदूषित पाण्याच्या ठिकाणी, पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधून इंगळी ओढ्यावर, अलाटवाडी ओढ्यावर, जयंती नाला, काळा ओढा येथे जाऊन भेटी दिल्या आणि पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.  

यावेळी जयसिंगपूरचे नगरसेवक पराग पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान, मधुकर पाटील,  इंगळी शिवसेना शहरप्रमुख केशव पाटील, उमेश शिंदे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.