Sun, Mar 24, 2019 22:58
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › ‘शाळा बंद’ विरोधात कृती समितीचा लढा

‘शाळा बंद’ विरोधात कृती समितीचा लढा

Published On: Feb 18 2018 1:58AM | Last Updated: Feb 18 2018 12:50AMनानीबाई चिखली : वार्ताहर 

शाहू महाराजांच्या कोल्हापूर जिल्ह्यात शासनाकडून बंद केल्या जाणार्‍या शाळांना विरोध करण्यासाठी शिक्षण बचाव नागरिक कृती समितीच्या वतीने दिला जाणारा लढा ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली देण्याचा निर्धार कृती समितीच्या पदाधिकार्‍यांनी   शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने आयोजित बैठकीत दिला. 

शैक्षणिक  व्यासपीठाच्या वतीने श्री प्रिन्स  शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस येथे आयोजित बैठकीत बहुमताने हा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी डी. बी. पाटील होते . व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड यांनी मुंबई येथे 22 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे मोर्चा काढण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. तसेच आझाद मैदानावर 28 फेबुवारी  2018 रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलनही करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.  महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शिक्षक कृती समितीच्या वतीने पेपर तपासणीवर टाकलेल्या बहिष्कारासही यावेळी शैक्षणिक व्यासपीठाने पाठिंबा दिला. माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांंच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात यावेळी करण्यात आला.

यावेळी नागरी कृती समितीचे वसंतराव मुळीक, अशोक  पोवार, कॉ. नामदेव गावडे, रमेश मोरे, पापा भोसले, गणी आजगेकर, व्यासपीठाचे व्ही.जी. पोवार, सुधाकर निर्मळे आद उपस्थित होते.