Wed, May 22, 2019 22:35होमपेज › Kolhapur › निपाणीजवळ अपघात; माय-लेकी ठार

निपाणीजवळ अपघात; माय-लेकी ठार

Published On: Jan 03 2018 1:12AM | Last Updated: Jan 03 2018 12:26AM

बुकमार्क करा
निपाणी : प्रतिनिधी

पुणे-बंगळूर महामार्गावर हॉटेल साई पॅलेसनजीक सोमवारी मध्यरात्री कारची झाडाला धडक बसून भीषण अपघातात आईसह दोन मुली ठार झाल्या, तर तिघे गंभीर जखमी झाले. 
सावित्री गुलाबचंद गुप्ता (वय 48), शोभा रवी गुप्ता (26), आरती गुलाबचंद गुप्ता (20) अशी मृत झालेल्यांची नावे आहेत. गंभीर जखमी नीलेश गुलाबचंद गुप्ता (वय 28), रवी मोहनलाल गुप्ता (29), चालक सूर्य ग्यानचंद शाहू (25, सर्व रा. हरियाली व्हिलेज, शाबू डिसोजा कंपाऊंड, टागोरनगर विक्रोळी ईस्ट, मुंबई) यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शोभाला गोव्यातील तिच्या मैत्रिणीने 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी गोव्याला बोलावले होते. शोभाच्या मैत्रिणीच्या घरी रात्री 31 डिसेंबरची पार्टी साजरी केली. सोमवारी दुपारपर्यंत देवदर्शन व काही ठिकाणांना भेटी देऊन रात्री 12 च्या सुमारास ते गोव्याहून निघाले. त्यांची कार तवंदी घाट उतारानजीक आली असता, चालक सूर्य याचा कारवरील ताबा सुटला. कारची रस्त्यालगतच्या झाडास जोराची धडक बसली. चालकाशेजारी बसलेल्या सावित्री यांचा जागीच मृत्यू झाला. शोभा व आरती यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने मोठा रक्तस्राव झाला असल्याने त्यांचाही मृत्यू झाला.