Fri, Mar 22, 2019 02:04
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › आंबेवाडीनजीक सुमो उलटून महिला ठार

आंबेवाडीनजीक सुमो उलटून महिला ठार

Published On: Apr 13 2018 1:17AM | Last Updated: Apr 12 2018 10:51PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

कोल्हापूर - रत्नागिरी मार्गावरील आंबेवाडीनजीक भाविकांची सुमो उलटून झालेल्या अपघातात महिला जागीच ठार झाली तर तेरा जण जखमी झाले. गुरुवारी सकाळी नउच्या सुमारास हा अपघात झाला. सुरेखा सातपुते (वय 25, रा. असोला, ता. परभणी) असे मृत महिलेचे नाव आहे जखमींत 3 बालकांचा समावेश आहे. 

जखमींची नावे अशी : ज्ञानोबा तिडके (वय 50), रामेश्‍वर तिडके (21), शांताबाई तिडके (40), कार्तिकी तिडके (5), श्रावणी तिडके (दीड वर्ष), सुरेखा तिडके (30), रानबा ढापसे (68), गयाबाई ढापसे (60), लिंबाजी तिडके (35, सर्व रा. पोरवाडी, परभणी), समर्थ सातपुते (7 महिने), अशोक बोचडे (22, रा. दामपुरी, परभणी),  प्रसाद बालटकर (18, रा. परभणी) व चालक सुदाम पाटील (24, रा. कोगे, करवीर) अशी जखमींची नावे आहेत. 

तिडके, ढापसे कुटूंबातील सदस्य देवदर्शनासाठी कोल्हापुरात आले होते. बुधवारी रेल्वेतून सर्वजण कोल्हापुरात पोहोचले. गुरुवारी जोतिबा व बाळूमामा दर्शनासाठी त्यांनी सुमो भाड्याने घेतली. गुरुवारी सकाळी सुमोतून जोतिबा दर्शनाला निघाले होते. आंबेवाडीपासून काही अंतरावर चालकाचा ताबा सुटून सुमो रस्त्याकडेला 7 ते 8 फूट खाली गेली. दोन पलटी मारुन रस्त्यापासून बाजूला गेली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने सुरेखा सातपुते यांचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला.  याप्रकरणी चालक सुदाम पाटील याच्यावर करवीर पोलिसांत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Tags : Kolhapur, Accident, Ambewadi, woman, killed