Fri, Apr 26, 2019 17:19होमपेज › Kolhapur › सलग सुट्ट्यांमुळे एटीएममध्ये खडखडाट

सलग सुट्ट्यांमुळे एटीएममध्ये खडखडाट

Published On: Dec 24 2017 1:44AM | Last Updated: Dec 23 2017 11:57PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

बँकांना असलेल्या सलग सुट्ट्यांमुळे ग्राहकांना एटीएमचा आधार घ्यावा लागत आहे. ख्रिसमस व 31 डिसेंबरच्या पार्श्‍वभूमीवर  शहर पर्यटकांनी फुलले असून, शहरातील काही एटीएममध्ये शनिवारी सायंकाळपासूनच खडखडाट जाणवत होता. त्याचा सर्वात जास्त फटका पर्यटकांना बसत होता.

महालक्ष्मी मंदिर परिसर, तसेच मध्यवर्ती बसस्थानक परिसरात अनेक पर्यटकांकडून एटीएमबाबत विचारणा होत होती. काही बँकांनी एटीएममधील  कॅशचा संभाव्य तुटवडा लक्षात घेऊन ग्राहकांना पॉस, इंटरनेट बँकिंग या पद्धतींचा व्यवहारांसाठी वापर करावा, असे मेसेजही पाठवले होते.