Tue, Apr 23, 2019 02:02होमपेज › Kolhapur › 'शेतकर्‍यांच्या बँका मोडण्यासाठीच नोटाबंदी'

'शेतकर्‍यांच्या बँका मोडण्यासाठीच नोटाबंदी'

Published On: Jan 02 2018 1:33AM | Last Updated: Jan 01 2018 11:27PM

बुकमार्क करा
कुडित्रे : प्रतिनिधी

शेतकर्‍यांच्या बँका मोडल्या पाहिजेत, हाच नोटाबंदीचा उद्देश होता म्हणून जिल्हा बँकेला जुन्या नोटा स्वीकारण्यास बंदी आणली. एकप्रकारे ही शेतकर्‍यावरच बंदी होती. यातून वर येण्यासाठीच जिल्हा बँकेने आपण चेअरमन असतानाच्या योजनांचेच पुनरुज्जीवन केले, असे प्रतिपादन जिल्हा बँक संचालक, भोगावतीचे चेअरमन पी. एन. पाटील (सडोलीकर) यांनी केले.

जिल्हा बँकेच्या कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील शाखेतील ए.टी.एम. केंद्राचे उद्घाटन करताना पाटील बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज उपस्थित होते.छत्रपती शाहू महाराज यांचेही भाषण झाले.  

यावेळी त्यांच्या हस्ते एटीएम सेंटरचे उद्घाटन झाले. प्रास्ताविक बँकेचे व्यवस्थापक जी. एम. शिंदे यांनी केले. स्वागत, सूत्रसंचालन व्यवस्थापक पंडितराव चव्हाण यांनी केले. कार्यक्रमास गोकुळचे अध्यक्ष विश्‍वास पाटील,  बाळासाहेब खाडे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, व्यवस्थापक आर. जे. पाटील,  शाखाधिकारी एल. एस. सासने आदी उपस्थित होते.