Wed, Jul 24, 2019 08:30होमपेज › Kolhapur › ‘ट्रेझर हंट’मुळे काही तासांची मोबाईलमुक्‍ती

‘ट्रेझर हंट’मुळे काही तासांची मोबाईलमुक्‍ती

Published On: Apr 23 2018 1:51AM | Last Updated: Apr 22 2018 11:02PMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

आधुनिक युगातील तरुणाई भोवती मोबाईलचा विळखा घट्ट झाला आहे. जवळजवळ बसलेले चार मित्र आपापसांत न बोलता हातात मोबाईल घेऊन मान खाली घालून मोबाईलच्या दुनियेत गुंग असतात. सभोवतालचे सामाजिक भानही ते विसरलेले असतात. अशा तरुणाईला काही तास का होईना मोबाईलचा विसर पडावा आणि त्यांनी आपल्या बुद्धिकौशल्य, निर्णय क्षमता, शारीरिक कष्ट या उपजत गुणांचा वापर करावा, या उद्देशाने क्रीडानगरी कोल्हापुरात ‘ट्रेझर हंट’ (खजिन्याचा शोध) या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात 26 टीम्सनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रत्येक टीममध्ये 4 मुले-मुली-तरुण आणि ज्येष्ठांचा समावेश होता. अशा स्पर्धेचे स्वागत स्पर्धक मुलांच्या पालकांकडून करण्यात आले. 

मैत्री फौंडेशनच्या ‘गो बिआँड द लिमिट्स’ अंतर्गत रविवार सकाळी 7 वाजल्यापासून मंगळवार पेठ-संभाजीनगर परिसरातील विभागीय क्रीडा संकुल येथे ही अनोखी स्पर्धा झाली. सावली केअर सेंटरचे किशोर देशपांडे, उद्योजक अमोल कोरगावकर, भाजपचे गणेश देसाई, नगरसेवक किरण नकाते, सुहास बोधे, सचिन पाटील, सुचित हिरेमठ यांच्या हस्ते उद्घाटन व बक्षीस समारंभ झाला.  संयोजन वैभव चंदगडकर, राजेंद्र सूर्यवंशी, संतोष जाधव, विनायक टिपुगडे, अर्चना शेंडगे, प्रवीण सुतार, मंदाकिणी सूर्यवंशी, महेश व्यापारी, विनोद साळोखे आदींनी केले. 

टीम ‘अर्हता’ची बाजी

ट्रेझर हंट स्पर्धेत टीम ‘अर्हता118’ ने विजेते-उपविजेते पटकाविले. विजेत्या संघात अभिजित कुलकर्णी, जीवनधर नवले, हेरंब मगदूम, आर्यवीर सरनोबत यांचा तर उपविजेत्या संघात पृथ्वी शहापुरे, पल्लवी मुग, आर्यन पाटील, नितीन नेमाडे यांचा समावेश होता. विजेत्यांना रोख रक्‍कम, पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 

Tags : Kolhapur, few, hours, mobile, deletion, due,  Treasure Hunt