Tue, Nov 20, 2018 21:45होमपेज › Kolhapur › जिल्हाध्यक्षपदी ए. वाय. पाटील निश्‍चित : आ. मुश्रीफ

जिल्हाध्यक्षपदी ए. वाय. पाटील निश्‍चित : आ. मुश्रीफ

Published On: Jun 16 2018 1:29AM | Last Updated: Jun 16 2018 12:22AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँगे्रसच्या जिल्हाध्यक्ष पदी विद्यमान जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांचे एकमेव नाव प्रदेश राष्ट्रवादी काँगे्रसकडे पाठवण्यात आल्याने त्यांची निवड निश्‍चित आहे. तथापि, शहराध्यक्ष पदाचा निर्णय न झाल्याने ही घोषणा झालेली नाही, अशी माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली. राष्ट्रवादीच्या 24 जिल्हाध्यक्षांच्या निवडी काल जाहीर झाल्या, त्यात कोल्हापूरचे नाव नव्हते. याबाबत मुश्रीफ म्हणाले, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष पदासाठी एकापेक्षा जास्त इच्छुक आहेत, त्यामुळे हा निर्णय झालेला नाही. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे नावे पाठवली आहेत, शहराध्यक्षाचा निर्णय झाला की जिल्हाध्यक्ष पदासाठी एकमेव नाव असल्याने ए. वाय. यांची निवड निश्‍चित होईल.