Mon, Aug 19, 2019 14:12



होमपेज › Kolhapur › अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखडा 87 कोटींचा

अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखडा 87 कोटींचा

Published On: Sep 06 2018 1:41AM | Last Updated: Sep 05 2018 11:50PM



कोल्हापूर : प्रतिनिधी

श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा पहिला टप्पा 68 कोटींवरून 87 कोटींचा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आराखड्यात नावीन्यपूर्ण बाबींचा समावेश करण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिकेच्या वतीने हा आराखडा मंगळवारी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाला सादर करण्यात आला. लवकरच प्रस्तावाला राज्य शासनाची अंतिम मंजुरी व निधीसाठी अधिसूचना निघण्याची शक्यता आहे.

श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील प्रस्तावाला राज्याच्या मुख्य सचिवांनी 9 जून 2017 ला मंजुरी दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पुन्हा आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आराखड्यात सूचना केल्या होत्या. त्यानुसार महापालिका प्रशासनाने बदल केले. तसेच विकासकामांसाठी जीएसटी लागणार असल्याने आराखड्याच्या किमतीत जीएसटीचा समावेश केला. त्यानुसार आराखडा 87 कोटी 17 लाखांचा झाला आहे. 

कोल्हापूर शहरात येणारे भाविक व पर्यटक यांना आवश्यक सुविधा पुरविणे, तसेच शहरातील संभाव्य गर्दी, वाहतूक व्यवस्थेचे योग्य नियोजन करण्यासाठी महालक्ष्मी मंदिराच्या पुरातन, ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन करण्यासाठी, तसेच मंदिर व भाविकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना आदीसाठी महापालिका प्रशासाने 255 कोटींचा प्रारूप विकास आराखडा तयार केला होता. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री पाटील यांनी तीन टप्प्यात प्रस्ताव तयार करण्याची सूचना केली होती. त्यानुसार पहिला टप्पा म्हणून 72 कोटींचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला होता. पुणे विभागीय आयुक्‍त कार्यालय व राज्य शासनाला हा प्रस्ताव सादर करण्यात आला. नंतर पुन्हा त्यात बदल सुचविण्यात आले. त्यानुसार पुन्हा हा प्रस्ताव 68 कोटी 70 लाखांचा करण्यात आला. प्रशासकीय स्तरावर त्याचे सविस्तर सादरीकरण होऊन मंजुरी मिळाली आहे.

...असा असेल आराखडा

 दर्शन मंडप इमारत - 3,82,43,592  भक्‍त निवास व पार्किंग - 42,15,79,586    स्वच्छतागृह - 45,22,003   सरस्वती टॉकिजजवळ बहुमजली पार्किंग - 7,92,28,800  बिंदू चौक बहुमजली पार्किंग - 6,54,71,625 बस थांबा - 5,55,600 एकूण - 61,46,02,206 जीएसटी 18 टक्क्यांप्रमाणे - 11,06,28,398 

 एकूण भाग अ - 72,52,30,604  भाग ब - पादचारी मार्ग - 1,23,95,903  दिशादर्शक फलक - 6,96,000 एकूण - 1,30,91,903  जीएसटी 12 टक्क्यांप्रमाणे - 15,71,029   एकूण भाग - ब  - 1,46,62,932 

भाग क - पिण्याच्या पाण्याची व्यवस्था - 11,46,960  भाग ड - सेवा वाहिन्यांचे स्थलांतर (युटिलिटी शिफ्टिंग)  विद्युतवाहिनी स्थलांतर - 2,42,11,914  टेलिफोन लाईन स्थलांतर - 25,85,000  पाणीपुरवठा व ड्रेनेजलाईन स्थलांतर - 1,51,95,198  भाग इ - आपत्ती व्यवस्थापन   अग्‍निशमन व्यवस्था - 1,68,71,440   सुरक्षा व्यवस्था - 91,62,915  आरोग्य सुविधा - 11,32,000   भाग  ई - घनकचरा व्यवस्थापन  भाग फ - विद्युतीकरण, सोलर व स्मार्ट पार्किंग सिस्टिम  दर्शन मंडप - 51,64,275  व्हिनस कॉर्नरजवळ भक्‍त निवास व पार्किंग इमारत - 1,95,61,587   बिंदू चौक बहुमजली पार्किंग इमारत - 59,29,783 

सरस्वती टॉकिज पार्किंग विद्युतीकरण करणे - 7,53,277  सौरऊर्जेचा वापर - 57,58,200  ज्येष्ठ भाविकांसाठी ई कार्ट सुविधा - 46,44,480   स्मार्ट पार्किंग व्यवस्था - 1,30,07,200 एकूण - 87,00,17,775 रुपये.