Thu, Apr 25, 2019 18:04होमपेज › Kolhapur › शहर, जिल्ह्यात ८० जणांना अटक

शहर, जिल्ह्यात ८० जणांना अटक

Published On: Jan 06 2018 1:22AM | Last Updated: Jan 06 2018 12:37AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर बंद काळात तोडफोड, दगडफेक केल्याप्रकरणी शुक्रवारी कोल्हापूर शहर व जिल्ह्यात 80 संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये अनिल म्हमाणे, किरण गायकवाड, मुकेश ऊर्फ शेखर सनदी यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

वाहने, दुकाने, हॉटेल्स, टपर्‍यांची तोडफोड, दगडफेकप्रकरणी 25 सीसीटीव्हीचे फुटेज उपलब्ध झाले आहे. फुटेज पाहणीअंती आणखी 95 हुल्लडबाजांची नावे निष्पन्‍न झाली आहेत. संबंधितांना लवकरच अटक केली जाईल, असे शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी सांगितले. शहरातील तोडफोड, दगडफेकप्रकरणी अटक केलेल्यांत शैलेश सुरेश जिरगे (वय 20, रा. सांगवडे, ता. करवीर), अनिल सुभाष म्हमाणे (38, उमा टॉकीज चौक परिसर), किरण राजेंद्र गायकवाड (20, सदर बाजार), लखन वसंत माने (22, सांगवडे), मुकेश ऊर्फ शेखर सनदे (41, सदरबाजार), सोनल राजू वाघमारे (27, सदर बाजार), संदीप भीमराव कांबळे (32, जाधववाडी), मनीष अरविंद काळे (21, रा. विचारे माळ), उमेश विजय कांबळे (37, विचारे माळ), बबन मुरलीधर सोनीकर (42, सदरबाजार) यांचा समावेश आहे, असेही अमृतकर यांनी सांगितले.  

रूकडी, माणगाव, हातकणंगले, जयसिंगपूर येथे झालेल्या तोडफोडप्रकरणी 70 जणांना अटक करण्यात आल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी सांगितले. चौकशीत निष्पन्‍न होणार्‍या संशयितांना तत्काळ अटक करण्याच्या सूचनाही अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत. जमावबंदीचा आदेश लागू असल्याने  मोर्चा, रॅली काढणार्‍यांवर थेट गुन्हे दाखल करून अटक करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, असेही मोहिते यांनी सांगितले.