Wed, Jul 17, 2019 18:04होमपेज › Kolhapur › राधानगरी धरण 77 टक्के भरले

राधानगरी धरण 77 टक्के भरले

Published On: Jul 16 2018 1:24AM | Last Updated: Jul 15 2018 10:58PMराधानगरी : प्रतिनिधी

राधानगरीसह पश्‍चिम भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. भोगावती नदी, ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. 

रविवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांत धरणाच्या पाणलोट क्षेत्रांत 125 मि.मी. पाऊस झाला असून, जूनपासून आजअखेर 2,245 मि.मी. पाऊस झाला आहे. गतवर्षी 1,588 मि.मी. पाऊस झाला होता. धरण 77.72 टक्के भरले असून, धरणात 6.46 टीएमसी पाणीसाठा आहे. तर धरणातून खासगी वीजनिर्मितीसाठी 1,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात होत आहे. धरणात 6,461.18 द.ल.घ.फू. 
इतका पाणीसाठा असून, 336.75 फूट पाणी पातळी आहे. 

धरण 347.50 फुटाला भरते. आठ दिवसांच्या पावसाने गतवर्षीची सरासरी ओलांडली असून, पावसाचा जोर असाच राहिल्यास धरण आठवडाभरात भरण्याची शक्यता आहे. दरम्यान, संततधार कोसळणार्‍या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.