Thu, Jun 27, 2019 10:25होमपेज › Kolhapur › गारगोटीतील इंजूबाई मंदिरात सात किलो चांदीची चोरी(व्हिडिओ)

गारगोटीतील इंजूबाई मंदिरात सात किलो चांदीची चोरी(व्हिडिओ)

Published On: Dec 07 2017 11:26AM | Last Updated: Dec 07 2017 11:26AM

बुकमार्क करा

गारगोटी : प्रतिनिधी 

गारगोटीतील इंजूबाई मंदिरातील मुर्तीसमोरील चांदीची प्रभावळ तोडून सुमारे सात किलो चांदी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. बुधवारी सायंकाळच्या सुमारास  इंजूबाई मंदिराचे दरवाजे  बंद करून पुजारी घरी गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिराचा दरवाजा कटावणीने उचकटून मंदिरात प्रवेश केला. विजेचे बटन बंद करून अंधारात मंदिराच्या गाभाऱ्यातील चांदीची प्रभावळ तोडली. सुमारे पाच ते सात किलोची चांदी चोरट्यांनी चोरली असल्याचे पुजाऱ्याने सांगितले. 

लक्ष्मी ज्वेलर्सचे अनिल कालेकर व अन्य भक्तानी चांदीची प्रभावळ भेट दिली होती.  याबाबतची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य राहून देसाई यांनी भुदरगड पोलिसांत दिली. अधिक तपास पोलिस निरिक्षक अरविंद चौधरी करत आहेत.