Sun, Mar 24, 2019 10:27होमपेज › Kolhapur › ७ लाख गरीब, ४ लाख श्रीमंत

७ लाख गरीब, ४ लाख श्रीमंत

Published On: Dec 10 2017 1:19AM | Last Updated: Dec 09 2017 11:35PM

बुकमार्क करा
आकडे काय सांगतात?

‘बीपीएल’ कार्डधारकांची संख्या :    1,45,696
दारिद्य्ररेषेखालील लोकसंख्या :    6,81,795  
हातकणंगलेत सर्वाधिक ‘बीपीएल’ कार्डधारक :    17,516
गगनबावड्यात सर्वात कमी ‘बीपीएल’ कार्डधारक :    923
जिल्ह्यात शुभ्र कार्डधारक :     92,932  
 


कोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यात सुमारे 7 लाख लोक गरीब आहेत. हे लोक दारिद्य्ररेषेखाली जीवन जगत आहेत. तर जिल्ह्यात 4 लाखांवर श्रीमंत लोक आहेत. अर्थात, हे सर्व करोडपती नसले, तरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांना श्रीमंत ठरवण्यात आले आहे.

जिल्ह्यात दारिद्य्ररेषेखाली जगणार्‍यांना ‘बीपीएल’ कार्ड देण्यात आले आहे. या कार्डद्वारे सवलतीच्या दरात रेशनवरून धान्य उपलब्ध करून दिले जाते. जिल्ह्यात ‘बीपीएल’ कार्डधारकांची संख्या 1 लाख 45 हजार 696 इतकी आहे. तर दारिद्य्ररेषेखाली जगणार्‍या लोकांची संख्या 6 लाख 81 हजार 795 इतकी आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक दारिद्य्ररेषेखालील संख्या हातकणंगले तालुक्यात आहे. या तालुक्यात 17 हजार 516 ‘बीपीएल’ कार्डधारक आहेत. त्याखाली कागल तालुक्यात 14 हजार 663 कार्डधारक आहेत. सर्वात कमी गरीब दुर्गम समजल्या जाणार्‍या गगनबावडा तालुक्यात 923 ‘बीपीएल’ कार्डधारक आहेत. एक लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्‍न असणार्‍या, तसेच सरकारी अथवा निमसरकारी नोकरी असणार्‍यांना शुभ्र रेशनकार्ड देण्यात येते.

प्रशासनाच्या द‍ृष्टीने हे श्रीमंत लोक आहेत. या शुभ्र कार्डधारकांना रेशनवरील धान्य, रॉकेल आदी कोणत्याच सुविधा नाहीत. जिल्ह्यात असे 92 हजार 932 कार्डधारक आहेत. यामध्ये 4 लाख 3 हजार 656 लोक आहेत. यापैकी सर्वाधिक कार्डधारक कोल्हापूर शहरात 33 हजार 941 इतके आहेत. सर्वात कमी गगनबावडा तालुक्यात अवघे 274 शुभ्र कार्डधारक आहेत.