Mon, Aug 19, 2019 11:13होमपेज › Kolhapur › जिल्ह्यातील ६८ जणांना तोडफोडप्रकरणी अटक

जिल्ह्यातील ६८ जणांना तोडफोडप्रकरणी अटक

Published On: Jan 08 2018 1:13AM | Last Updated: Jan 08 2018 12:14AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी 

भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यात विविध ठिकाणी बंद पुकारण्यात आला होता. बंददरम्यान शहरात दगडफेक आणि तोडफोडीचा प्रकार घडला. याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी दोन दिवसांत 68 जणांना अटक केली आहे. रविवारीही जिल्ह्यात अटक सत्र सुरू होते. अटकेची संख्या आतापर्यंत 170 च्या घरात पोहोचली आहे. 

राजारामपुरी पोलिसांनी अटक केलेल्या 14 जणांचा ताबा रविवारी राजवाडा पोलिसांनी घेतला. त्यांच्यावर गुजरी, महाद्वार रोड, जोतिबा रोड येथे दगडफेक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये 12 वाहने आणि 17 दुकाने असे 2 लाख 87 हजारांचे नुकसान झाल्याचे राजवाडा पोलिसांनी फिर्यादीत म्हटले आहे. शाहूपुरी, लक्ष्मीपुरी पोलिसांनीही रविवारी रात्री काहींना ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.