Thu, Apr 25, 2019 15:26होमपेज › Kolhapur › 66 जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव 

66 जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव 

Published On: Jul 12 2018 1:41AM | Last Updated: Jul 12 2018 12:46AMइचलकरंजी : वार्ताहर

तडीपार कारवाई सप्‍ताह मोहिमेअंतर्गत इचलकरंजी शहरासह उपविभागातील 31, तर जयसिंगपूर उपविभागातील 35 अशा एकूण 66 जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव मंजुरीसाठी पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्याकडे सादर करण्यात आले असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी बुधवारी पत्रकारांना दिली. गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्यांचीही यादी तयार करण्याचे काम गतीने सुरू असून लवकरच त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असा इशाराही पिंगळे यांनी दिला.

आगामी गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, त्याचबरोबर लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने इचलकरंजी शहरासह हातकणंगले व शिरोळ तालुक्यांत शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस दलाच्या वतीने 4 ते 10 जुलैदरम्यान इचलकरंजी व जयसिंगपूर उपविभागामध्ये तडीपार कारवाई सप्‍ताह मोहीम हाती घेण्यात आली होती. याअंतर्गत दोन्ही उपविभागांतील पोलिस ठाण्यांना जास्तीत जास्त हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.

महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 55 प्रमाणे हद्दपारीतील प्रस्तावित गावभाग पोलिस ठाणे - विशाल माछरे, नरेश नवले, शशिकांत घारुंगे, सतीश भाट, बाळू कोळी, सदाशिव कोरवी, दीपक नेतले, विक्रम नगरकर, संध्या नेतले, रंजिता घमंडे, कला गागडे, नंदा नेतले, शोभा गागडे; शिवाजीनगर पोलिस ठाणे - ओंकार डकरे, राजेंद्र ऊर्फ अभिजित तळकर, राहुल माने, जीवन जाधव, दत्तात्रय डकरे, आनंद ऊर्फ सतीश जाधव, दीपक कडगावे, किरण मोरे, महेश व्हनाळ. महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 56 प्रमाणे हद्दपारीतील प्रस्तावित गावभाग पोलिस ठाणे - अभिजित देसाई, समरजित पाटील; शिवाजीनगर पोलिस ठाणे - हुसेन शेख, तानाजी कांबळे, विकी ऊर्फ विकास मकोटे, रियाज सावळगी; शहापूर पोलिस ठाणे - मनोज जगदाळे (रा. तारदाळ); कुरूंदवाड पोलिस ठाणे - दादाखान मोकाशी (खिद्रापूर). 

मुंबई दारूबंदी कायदा कलम 93 प्रमाणे हद्दपारीतील प्रस्तावित गावभाग पोलिस ठाणे - सौ. निशा तमायचे, इंद्रजित गागडे, हीना नवले, संजू गागडे, विजय पवार, सुनीता गागडे; शिवाजीनगर पोलिस ठाणे - विनोद गायकवाड, रवी गागडे, रवींद्र परीट, कैलास मिणेकर, रमेश हणबर, आक्‍काताई गवरे; शहापूर - प्रियांका बागडी (खोतवाडी). कुरूंदवाड - आनंदा पाटील (सैनिक टाकळी), संगीता तराळ (दत्तवाड), कल्पना निकम (दत्तवाड), विजय कांबळे (दानवाड), मोहसीन मुजावर (शिरढोण), सर्जेराव भंडारी (शिरढोण), शहनाज मुल्ला (हेरवाड); हुपरी पोलिस ठाणे - प्रकाश कांबळे (तळंदगे फाटा).