Fri, Aug 23, 2019 23:15होमपेज › Kolhapur › जिल्ह्यातील रस्त्यांसाठी 64 कोटी

जिल्ह्यातील रस्त्यांसाठी 64 कोटी

Published On: Jul 04 2018 2:14AM | Last Updated: Jul 04 2018 1:24AMकोल्हापूर : विकास कांबळे

मुख्यमंत्री सडक योजनेतून चालू वर्षात बॅच एकअंतर्गत तसेच संशोधन विकासअंतर्गत जिल्ह्यातील करण्यात येणार्‍या 102 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांसाठी 64 कोटी 36 लाख रुपये शासनाने मंजूर केले आहेत. या कामाच्या लवकरच निविदा प्रसिद्ध करण्यात येतील. दिवाळीमध्ये या कामाला सुरुवात होण्याच शक्यता आहे.

केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री सडक योजना काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली. त्याच धर्तीवर राज्यात सत्तेवर आलेल्या नवीन सरकारने  मुख्यमंत्री ग्रामसडक योजना नव्याने सुरू केली. या योजनेत जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्याप्रमाणे  कोल्हापूर जिल्ह्यातूनही रस्त्यांच्या कामाचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. चालू 2018-19 या वित्तीय वर्षात बॅच एकअंतर्गत जिल्ह्यातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी प्रशासकीय मान्यता शासनाने दिली आहे. यातून 60.75 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा समावेश आहे. त्यासाठी 35 कोटी 9 लाखाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. बॅच एकमध्ये आजरा तालुक्यातील भटवाडी फाटा ते कोेळिंद्रे (वाटंगी ते शिरसंगी रस्ता) 2.300 कि.मी., पेरनोली ते करपेवाडी 4.300 कि.मी., भुदरगडमधील निळपण तेे पांदिवरे 5 कि.मी., मठगाव रस्ता 5 कि. मी., चंदगडमधील शिरगाव ते सत्तेवाडी 8.200 किलोेमीटर, मलतवाडी रस्ता 5.700 कि. मी. गडहिंंग्लजमधील नौकुड ते इदरगुच्ची 6.460 कि.मी., हातकणंगलेतील हेर्ले ते माले मुडशिंगी 3.500 कि. मी., राधानगरीतील पाल खुर्दजवळचा 6 कि.मी., दुर्गमानवाड ते मिसाळवाडी 5 कि. मी., शिरोळ तालुुक्यातील जांभळी ते चिपरी 5.100 कि.मी व 5.190 कि. मी.  लांंबीचा रस्ता करण्यात येणार आहे. 

या कामांना तांत्रिक मंजुरी देण्यापूर्वी व काम सुरू करण्यापूर्वी रस्त्यांच्या कामाचा वाव काटेकारपणे तपासून त्याप्रमाणे संकल्पन निश्‍चित करावे, त्याचप्रमाणे रस्त्यासाठी लागणार्‍या जमिनीचा ताबा आहे की नाही, याची खातरजमा करून घ्यावी,  खासगी जमीन, वन विभागाची नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक असलेल्या रस्त्यांची कामे हाती घेण्यात येऊ नयेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

या रस्त्यांनाही मिळाला निधी
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील संशोधन व विकास अंतर्गत जिल्ह्यातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी 27 कोटी 15 लाखांच्या 41.39 कि.मी. लांबीच्या रस्त्यांच्या कामांना शासनाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. यातून आजरा तालुुक्यातील पारेवाडी ते पेठेवाडी रस्ता 2.140 कि. मी., अर्दाळ हालेवाडी-वडकशिवाले रस्ता 3.510 कि. मी., माद्याळ ते  मेढेवाडी 2 कि. मी., भुदरगडमधील पडखंबे ते रावणवाडी 3.60 कि. मी., वेसर्डे ते अंतिवडे डेळे 2 कि. मी., शेेेणगाव ते फये 4 कि. मी., कळंंकवाडी ते घुडेवाडी 4.500 कि. मी., राधानगरीतील खामकरवाडी ते  दुर्गमानवाड 2.100 कि. मी., शेेेळेवाडी ते घोटवडे 3.300 कि. मी., कासारवाडा ते भुदरगड हद्द 7.860 कि. मी., करवीरमधील नंदगाव ते हंचनाळवाडी 1  कि. मी., हातकणंगलेतील नागाव ते पुणेकर वसाहत 1.500 कि. मी., नागाव ते मेनन फॅक्टरी 1 कि. मी., शिरोली ते माळवाडी 3.110 कि. मी. लांबीच्या रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत.