Wed, May 27, 2020 01:55होमपेज › Kolhapur › कोल्हापूर जिल्ह्यात ६०१ जणांना केलं क्वारंटाईन

कोल्हापूर जिल्ह्यात ६०१ जणांना केलं क्वारंटाईन

Last Updated: Apr 02 2020 8:32PM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा 

जिल्ह्यातील ११ निवारागृहांमध्ये राज्यातील ११४ आणि परराज्यातील ४८७ अशा एकूण ६०१ जणांना संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. यात सर्वात जास्त तामिळनाडूमधील १९० जणांचा तर सर्वात कमी पश्चिम बंगालमधील एकाचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. 

कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात शेठ रुईया विद्यालय, मंगळवार पेठ येथे राज्यातील १७ परराज्यांतील ५ अशा २२ जणांचा समावेश  असून याची क्षमता ५० जणांची आहे. रामकृष्ण हॉल, लोणार वसाहत राज्यातील १७ परराज्यातील ८ अशा २५ जणांचा समावेश असून याची क्षमता ५० जणांची आहे.

करवीर तालुका- सरस्वती मंगल कार्यालय उजळाईवाडी  येथे राज्यातील २ परराज्यातील ३५ एकूण ३७ जण असून क्षमता ७० जणांची आहे.
 
कागल- डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह कागल येथे राज्यातील ३ परराज्यातील ९७ एकूण १०० जण असून  क्षमता ११७  जणांची आहे. जयसिंगराव घाटगे विद्यालय येथे राज्यातील ४ परराज्यातील ३९ असे एकूण ४३ जण असून क्षमता ५० जणांची आहे. 

हातकणंगले-घुगरे सर यांचे  निवासी गुरुकुल वडगाव येथे राज्यातील १ परराज्यातील ७५ असे एकूण ७६ जण असून क्षमता १०० जणांची आहे.  अशोकराव माने ग्रुप  वाठार तर्फ वडगाव राज्यातील २ परराज्यातील ११३ असे एकूण ११५ जण असून क्षमता ११५ जणांची आहे. शहरी बेघर निवारा केंद्र इचलकरंजी येथे राज्यातील ५० आहेत.

शिरोळ- शाळा क्रमांक १ जयसिंगपूर येथे परराज्यातील १८ असून क्षमता २५ जणांची आहे. गगनबावडा- माधव विद्यालय गगनबावडा येथे राज्यातील १३ असून क्षमता २० जणांची आहे. समाज कल्याण निवासी शाळा वसतीगृह गगनबावडा येथे राज्यातील ५ परराज्यातील ९७ असे एकूण १०२ असून क्षमता १०५ जणांची आहे. 

यामध्ये कर्नाटकातील १८८, तामिळनाडूमधील १९०, राजस्थानमधील ५८, उत्तरप्रदेशमधील २८, मध्य प्रदेशमधील १४, पाँडेचरी मधील ३, पश्चिम बंगालमधील १, केरळमधील ५ अशा एकूण ८ राज्यातील ४८७ जणांचा तसेच महाराष्ट्रातील ११४ असे मिळून ६०१ व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.

कोल्हापूर महापालिकेच्यावतीने ५२२ नागरिक क्वारंटाईन

महापालिकेच्यावतीने कोल्हापूर शहरात स्थापन करण्यात आलेल्या अलगीकरण (क्वारंटाईन) कक्षात २९६ नागरीकांना ठेवण्यात आले. तसेच २२६ नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
महापालिकेच्यावतीने शेंडापार्क येथील आरोग्य प्रशिक्षण केंद्रातील क्वारंटाईन कक्षा २६, खासगी ठिकाणी १८, अंडी ऊबवणी केंद्रात ३८, पंजाबराव देशमुख वसतिगृह ७८, गर्व्हमेंट पॉलिटेक्नीक ५१ व राजाराम कॉलेज अल्पसंख्यांक हॉस्टेल ८५ येथे नागरिकांना क्वारंटाईन कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे. या सर्वांना चौदा दिवस या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे.