Mon, Jan 21, 2019 15:07होमपेज › Kolhapur › बँकेतून बोलत असल्याचे सांगून ५८ हजारांची फसवणूक

बँकेतून बोलत असल्याचे सांगून ५८ हजारांची फसवणूक

Published On: May 10 2018 1:35AM | Last Updated: May 10 2018 1:01AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

राष्ट्रीयीकृत बँकेतून बोलत असल्याचे सांगून वृद्धाच्या क्रेडिटकार्ड खात्यावरील 58 हजारांची रक्‍कम ऑनलाईन ट्रॅन्जॅक्शनद्वारे लुबाडण्यात आली. अजित बाबुराव कुलकर्णी (वय 60, रा. राजाराम पार्क, संभाजीनगर) यांनी राजवाडा पोलिसांत फिर्याद दाखल केली.

अजित कुलकर्णी यांना 5 ते 7 मेदरम्यान बँकेतून बोलत असल्याचे सांगून वेळोवेळी फोन आले होते. संबंधिताने जन्म तारीख, राहण्याचा पत्ता, क्रेडिट कार्ड नंबर, गोपनीय ओटीपी नंबर अशी माहिती घेतली. दरम्यान, खात्यातील 58 हजार 199 रुपये काढून घेतल्याचे मंगळवारी कुलकर्णी यांच्या निदर्शनास आले. त्यांनी यावेळी बँकेशी संपर्क साधला असता, असा कोणताही फोन केला नसल्याचे सांगण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर कुलकर्णी यांनी पोलिसांशी संपर्क साधला. याप्रकरणी राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला.