Fri, Apr 26, 2019 17:33होमपेज › Kolhapur › आणखी 54 जणांना डेंग्यू

आणखी 54 जणांना डेंग्यू

Published On: Jul 12 2018 1:41AM | Last Updated: Jul 12 2018 12:15AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर शहरात बुधवारी आणखी 54 डेंग्यूचे रुग्ण आढळले. त्यामुळे जुलैमधील रुग्णांची संख्या 304 झाली आहे. परिणामी, शहरात डेंग्यूचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासनाने  डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या 33 प्रभागांत सर्वेक्षण करण्यासाठी 11 पथके तयार केली आहेत. 

महापालिकेच्या पथकांनी बुधवारी दिवसभरात भोसलेवाडी, घाटगे कॉलनी, विचारे माळ, राजारामपुरी, राजेंद्रनगर, अंबाई टँक परिसर, जुना बुधवार पेठ परिसर आदी ठिकाणी 775 घरांची तपासणी केली. साडेतीन हजारांवर नागरिकांची पाहणी केली. 105 ठिकाणी साठलेल्या पाण्यात डेंग्यू डासांच्या अळ्या सापडल्या. महापालिका कर्मचार्‍यांनी त्या अळ्या नष्ट केल्या. दरम्यान, महापालिकेने स्थापन केलेल्या पथकात प्रत्येकी दहा कर्मचार्‍यांचा समावेश आहे. पथकाने बुधवारी जवाहरनगर, कदमवाडी परिसरात सर्वेक्षण केले. यापुढे राजारामपुरी, रविवार पेठ, मंगळवार पेठ, कनाननगर, शिवाजी पेठ, संभाजीनगर, नागाळा पार्क, शाहूपुरी, रुक्मिणीनगर, चिले कॉलनी, विक्रमनगर, ताराबाई पार्क आदी ठिकाणी सर्वेक्षण करण्यात येणार आहे.