होमपेज › Kolhapur › काळम्मावाडीतून ५००० क्युसेक विसर्ग  

काळम्मावाडीतून ५००० क्युसेक विसर्ग  

Published On: Aug 14 2018 1:10AM | Last Updated: Aug 14 2018 12:10AMकाळम्मावाडी : वार्ताहर

दूधगंगानगर (ता. राधानगरी) येथील राजर्षी शाहू सागर परिसरात पावसाचा जोर वाढला असल्याने काळम्मावाडी धरणान प्रतिसेकंद पाच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग दूधगंगा नदीपात्रात 13 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आला आहे. 

काळम्मावाडीच्या 5000 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग झाल्याने दूधगंगा नदी पात्रातील सोळांकूर, सुळंबी (जुना बंधारा) पाण्याखाली दुसर्‍यांदा जाण्याची शक्यता आहे. तर दूधगंगा काठावरची ऊस, भात पिके पाण्याखाली जात असल्याने पिकाचे मोठे नुसकान होणार आहे. 

आजअखेर धरण परिसरात 2951 मि. मीटर पाऊस झाला असून धरणाच्या जलाशयाची पातळी 645.09 मीटर असून पाणीसाठा 688.343 द. ल. घ. मी. (24 .31 टी. एम. सी.) म्हणजे 95.76 टक्के धरण भरले आहे .