होमपेज › Kolhapur › चेन्‍नईत ५० कोटीला गंडा; फरारी संशयिताला अटक

चेन्‍नईत ५० कोटीला गंडा; फरारी संशयिताला अटक

Published On: Jan 02 2018 1:32AM | Last Updated: Jan 02 2018 1:22AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

जमीन खरेदी-विक्री व्यवसायात एक जमीन तिघांना कराराद्वारे विक्री करतो, असे सांगून 50 कोटी घेऊन पसार झालेल्या चेन्‍नईतील लँडमाफियाला गांधीनगर व गोकुळ शिरगाव पोलिसांनी रविवारी मध्यरात्री अटक केली. एस.व्यकटरामन श्रीरंगराजन (वय 57, रा.ए.कामराज,चेन्‍नई) असे त्याचे नाव आहे. दोन वर्षांपूर्वी संशयित चेन्‍नईतून पसार झाला होता.

श्रीरंगराजन याने 2015 मध्ये चेन्‍नई येथील लोकांना जमीन विकत देतो असे आमिष दाखवून तिघा ग्राहकांकडून लेखी करार करून पैसे उचलले. त्यानंतर जमीन दुसर्‍याच व्यक्‍तीला विक्री करून 50 कोटींची रक्‍कम घेऊन तो पसार झाला होता. मोबाईल लोकेशनद्वारे संशयिताचा गोकुळ शिरगाव व गांधीनगर परिसरात वावर असल्याचे निदर्शनास आले होते.  चेन्‍नई येथील क्राईम ब्रँचचे मुथुवेल पांडे, पोलिस निरीक्षक आनंद बाबू, उपनिरीक्षक कमल मोहन, कॉन्स्टेबल संदीप कुमार, लोकेश चरण यांचे पथक कोल्हापूर येथे दाखल झाले. पथकाने पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांची भेट घेवून संशयिताला पकडण्यासाठी मदत करण्याची विनंती केली.

मोहिते यांनी गांधीनगरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, गोकुळ शिरगावचे सहाय्यक निरीक्षक युवराज खाडे यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार छापा टाकून श्रीरंगराजन यास पंचतारांकित एमआयडीसीमध्ये ताब्यात घेण्यात आले. संशयिताला घेऊन पथक चेन्‍नईला रवाना झाले.