Fri, Jul 03, 2020 02:51होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात आणखी ९ रुग्ण सापडले

कोल्हापुरात आणखी ९ रुग्ण सापडले

Last Updated: May 28 2020 10:09PM

file photo 

 

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात गुरुवारी रात्री आलेल्या अहवालांमध्ये नवे ९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तसेच सकाळी आलेल्या अहवालांमध्ये २५ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. नव्याने सापडलेल्या रुणांबरोबरच आता जिल्ह्यातील बाधितांचा आकडा ४३६ वर गेला आहे.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरु असतानाच एक दिलासादायक बातमी आली आहे. जिल्ह्यातील आणखी ४९ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. चौदा दिवसांच्या वैद्यकीय उपचारानंतरचे २४ तासांत त्यांचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यांना सीपीआरमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत ९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचा चौथा बळी गेला. कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या यमेहट्टी (ता. गडहिंग्लज) येथील ५२ वर्षीय व्यक्‍तीचा गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात काल दुपारी दीड वाजता मृत्यू झाला. सायंकाळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांनी सांगितले होते.

गडहिंग्लज तालुक्यात सलग दोन दिवसांत कोरोनाने दोन मृत्यू झाल्याने तालुक्यातील आरोग्य यंत्रणा हादरली आहे.