होमपेज › Kolhapur › 47 अधिकार्‍यांचे होणार जिल्ह्याबाहेर पोस्टिंग

47 अधिकार्‍यांचे होणार जिल्ह्याबाहेर पोस्टिंग

Published On: Mar 15 2018 1:18AM | Last Updated: Mar 14 2018 10:09PMकोल्हापूर : दिलीप भिसे

कोल्हापूर पोलिस दलात निश्‍चित कार्यकाळ झालेल्या उपअधीक्षक, वरिष्ठ निरीक्षकांसह 47 अधिकार्‍यांच्या एकाचवेळी जिल्ह्याबाहेर ‘पोस्टिंग’ होत आहे. अधिक संख्येने वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्यांमुळे जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांतर्गत पुनर्रचनेसाठी प्रशासकीयस्तरावर हालचाली गतिमान झाल्या आहेत. प्रामुख्याने इचलकरंजीचे उपअधीक्षक विनायक नरळे, ‘एलसीबी’चे दिनकर मोहिते, यशवंत गवारी, निशिकांत भुजबळ, अरविंद चौधरी, अशोक धुमाळ आदींचा समावेश आहे.

पोलिस दलांतर्गत अधिकारी, कर्मचार्‍यांसाठी प्रभारी अधिकारीपदावर कार्यरत असताना सेवा कालावधी निश्‍चित करण्यात आला आहे. उपनिरीक्षकासह वरिष्ठ पोलिस निरीक्षकासाठी परिक्षेत्रात आठ वर्षे, जिल्ह्यात 4 वर्षे, पोलिस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून 2 वर्षांचा सेवाकाळ, तर पोलिस कर्मचार्‍यासाठी उपविभागीय कार्यक्षेत्रात 12, तर पोलिस ठाण्यासाठी 5 वर्षांचा सेवाकाळ निश्‍चित करण्यात आला आहे. 

2012 मध्ये नियुक्‍त झालेल्या पोलिस कर्मचार्‍यांसह जिल्ह्यात चार वर्षे व पोलिस ठाण्यांतर्गत दोन वर्षे सेवाकाळ झालेल्या 47 प्रभारी अधिकार्‍यांच्या येत्या काही दिवसांत जिल्ह्याबाहेर बदल्या होत आहेत. 
इचलकरंजीचे पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांच्यासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या पोलिस ठाण्यांतर्गत अधिकार्‍यांचा यात समावेश आहे. सेवा कार्यकाळ झालेल्या अधिकार्‍यांचा अहवाल पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी विशेष पोलिस महासंचालक विश्‍वास नांगरे-पाटील यांना सादर केला आहे.

मोहितेंसह यशवंत गवारी (पेठवडगाव) यांचा कोल्हापूर परिक्षेत्रात आठ वर्षांचा कार्यकाळ झाला आहे. जिल्ह्यात चार वर्षांचा सेवाकाळ झालेल्यांत पोलिस निरीक्षक निशिकांत भुजबळ (विमानतळ), शौकत जमादार (पासपोर्ट सुरक्षा), संजय साळुंखे (कॉम्रेड पानसरे हत्या तपास पथक), अनिल गाडे (शाहूवाडी), अरविंद चौधरी (भुदरगड), धनंजय जाधव (मानव संशोधन विभाग), सतीश पवार (शिवाजीनगर, इचलकरंजी), अशोक धुमाळ (शहर वाहतूक शाखा, कोल्हापूर), सहायक निरीक्षक राकेश हांडे (मूरगूड पोलिस ठाणे), पुष्पलता मंडले (करवीर), विद्या जाधव (एएचटीयू, कोल्हापूर), वैष्णवी पाटील (नियंत्रण कक्ष), गजानन देशमुख (वडगाव), विकास जाधव (कोडोली), अर्जुन पवार (इस्पुर्ली), दत्तात्रय कदम (जयसिंगपूर), निरंजन रणवरे (इचलकरंजी), शिवाजी दराडे (जुना राजवाडा), पोलिस उपनिरीक्षक अनिल मोरे (शिवाजीनगर), अमित मस्के (बीडीडीएस, कोल्हापूर), युवराज आठरे (एलसीबी), दिलीप तिबिले (करवीर), पांडुरंग ताटे (करवीर), रमेश ढाणे (गांधीनगर), राजश्री सदामते (वाचक जयसिंगपूर), रावसाहेब रानगर (हातकणंगले), राजेंद्र भूतकर (जुना राजवाडा), प्रकाश कांबळे (गोकुळ शिरगाव), अण्णाप्पा कांबळे (राजारामपुरी), शामराव देवणे (कोडोली), शरद माळी (शिरोळ), सूर्यकांत शिरगुप्पी (शिरोली), जनार्दन जाधव (नियंत्रण कक्ष), दिलीप शिंदे (वाचक शाखा), राम गोमारे (इचलकरंजी), पद्मराज गंपले (राजारामपुरी), पोलिस उपनिरीक्षक संदीप बोरकर (कोडोली), अमोल तांबे (मुरगूड), श्रीराम पडवळ (शाहूवाडी), सोमनाथ पांचाळ (गांधीनगर), मीना मरे (आजरा), सचिन पंडित (शाहूपुरी), श्रीकांत पाटील (राजारामपुरी), प्रशांत यम्मेवार (शाहूवाडी), रमेश हत्तीगोटे (शिवाजीनगर) यांचा जिल्ह्यातील चार वर्षांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे 10 वरिष्ठ निरीक्षक, 10 सहायक निरीक्षक, 27 पोलिस उपनिरीक्षकांच्या लवकरच जिल्ह्याबाहेर बदल्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.