Sun, Jul 21, 2019 08:24होमपेज › Kolhapur › तुरंबे येथील सिद्धीविनायक मंदिरात ४ लाखांचा अपहार

तुरंबे येथील सिद्धीविनायक मंदिरात ४ लाखांचा अपहार

Published On: Apr 28 2018 1:42AM | Last Updated: Apr 28 2018 12:40AMतुरंबे : वार्ताहर

कोल्हापूर - गारगोटी राज्यमार्गावरील तुरंबे येथील सिद्धीविनायक मंदिरात 4 लाख रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप तुरंबेचे सरपंच आणि सदस्यांनी केला आहे. येथील विश्वस्त परस्पर दानपेटी फोडतात, सरपंचांना विश्वासात घेत नाहीत, असाही आरोप सरपंचांनी केला आहे. 

गेल्या काही वर्षात येथील दानपेटीतील जमा होणार्‍या पैशाचा तसेच नारळ तांदूळ विक्रीतून मिळणार्‍या पैशांचा अपहार होत असल्याचा आरोप सरपंच जयश्री भोईटे, सदस्य अजित खोत, शिवाजी मगदूम व अन्य सदस्यांनी केला आहे. नोटाबंदीच्या काळात देणगी पेटीतील पैसे बदलून आणण्यासाठी दिले असता ते अद्याप मिळाले नसल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी  केला आहे. 

या संदर्भात मंदिर ट्रस्टचे सचिव रघुनाथ वागवेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, असा प्रकार झालाच नाही. सरपंचांनी केलेले आरोप चुकीचे आहेत.