Sun, Jul 05, 2020 22:03होमपेज › Kolhapur › कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या ५६२ वर

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या ५६२ वर

Last Updated: May 30 2020 6:08PM

संग्रहित छायाचित्रकोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच आहे. आज, शनिवारी रात्री ९.४५ वाजेपर्यंत ५८ रुग्णांची भर पडली. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा ५६२ वर पोहोचला आहे.

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा काही केल्या कमी होईना. गेल्या तीन दिवसांपासून त्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. शुक्रवारी उच्चांकी ६८ रुग्ण आढळून आले होते. गडहिंग्लज तालुक्यात शनिवारी (ता.३०) दिवसभरात २७ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून, सायंकाळी सात वाजेपर्यंत एकूण ६५ रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये गेल्या तीन दिवसांमध्ये तब्बल ५२ रुग्णांची भर पडली आहे. 

चंदगड तालुक्यात काल दिवसभरात सर्वाधिक १७ रुग्ण आढळून आले. कोरोनाने मृत्यू झालेल्या यमेहट्टी (ता. गडहिंग्लज) येथील ५२ वर्षीय व्यक्‍तीच्या चौघा नातेवाईकांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या संख्येने जिल्हा प्रशासनाचे टेन्शन वाढत चालले आहे. गडहिंग्लज, राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यात कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून येत आहे.