Thu, Jun 04, 2020 06:50होमपेज › Kolhapur › कोरोनाच्या धास्तीत कोल्हापूरकरांना आणखी एक मोठा दिलासा

कोरोनाच्या धास्तीत कोल्हापूरकरांना आणखी एक मोठा दिलासा

Last Updated: Apr 10 2020 5:31PM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाच्या धास्तीच्या वातावरणात कोल्हापूरांना आणखी एक मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या मंगळवारी आणि बुधवारी पाठविण्यात आलेले एकूण २९ स्वॅब नमुने निगेटिव्ह आले आहेत. आज सकाळी १४ आणि सायंकाळी १५ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचा पाचवा रुग्ण आढळला होता. शाहूवाडी तालुक्यातील उचत येथील ३० वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांनी ही माहिती दिली. 

दरम्यान, सीपीआरच्या कोरोना कक्षात उपचार घेत असलेल्या एका ५० वर्षीय व्यक्तीचा गुरुवारी दुपारी मृत्यू झाला. तर कसबा बावड्यातील कोरोनाबाधित महिलेसह रुग्णवाहिकेतून प्रवास केलेल्या विठलाईवाडी (ता. करवीर) येथील तरुणाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. या तरुणाने कराड ते कोल्हापूर असा प्रवास रुग्णवाहिकेतून केला होता. त्याच्या सहप्रवासी असलेल्या ६३ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समजताच त्याने आरोग्य केंद्र गाठले होते.