Thu, Apr 25, 2019 08:00होमपेज › Kolhapur › ‘अन्‍न सुरक्षा’साठी २८ कोटी निधी

‘अन्‍न सुरक्षा’साठी २८ कोटी निधी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

अन्‍न सुरक्षा योजनेसाठी जिल्ह्याला यावर्षी 28 कोटी 64 लाख 94 हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या योजनेंतर्गत देण्यात येणार्‍या अन्‍नधान्याच्या विक्रीतून जमा होणारी रक्‍कम आणि त्याकरिता होणारा खर्च यातील तूट भरून काढण्यासाठी हा निधी देण्यात आला आहे.

केंद्र शासनाने 5 जुलै 2013 रोजी अन्‍न सुरक्षा अधिनियम मंजूर केला. त्यानुसार 1 फेब्रुवारी 2014 पासून राज्य शासनाने राज्यात अन्‍न सुरक्षा योजना लागू केली. या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील लोकसंख्येच्या 75 टक्के तर शहरी भागातील लोकसंख्येच्या 50 टक्के लोकांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. प्राधान्य गट आणि अंत्योदय योजना या द्वारे कमी दरात गहू आणि तांदूळ रेशनद्वारे वितरित केले जातात.

या योजनेसाठी राज्यात दरवर्षी सुमारे 3 लाख 83 हजार 758 मेट्रिक टन अन्‍नधान्याची गरज असते. स्वस्त दरात हे धान्य वितरित केले जाते. यामुळे धान्याची वाहतूक, हमाली, साठवणूक आदीकरिता होणारा खर्च  पाहता या योजनेतील तूट भरून काढण्यासाठी निधी देण्यात येतो.

राज्यासाठी यावर्षी 385 कोटी 24 लाख 14 हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. जिल्ह्यासाठी एप्रिल 2017 ते ऑक्टोबर 2017 या कालावधीसाठी 12 कोटी 97 लाख 84 हजार रुपये तर नोव्हेंबर 2017 ते मार्च 2018 या कालावधीसाठी 15 कोटी 67 लाख 10 हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

 

Tags : kolhapur, kolhapur news, food security, fund,


  •