Sun, Jun 16, 2019 12:36
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › विमानतळ विस्तारीकरणासाठी २७४ कोटी मंजूर : खा. महाडिक

विमानतळ विस्तारीकरणासाठी २७४ कोटी मंजूर : खा. महाडिक

Published On: Dec 15 2017 2:44AM | Last Updated: Dec 15 2017 2:22AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी 274 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्याच्या कामाच्या निविदा फेब्रुवारी महिन्यात काढण्यात येणार आहेत. यामुळे दोन वर्षांत कोल्हापूरचे विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, कोल्हापूर विमानतळावर केवळ छोट्या आकाराची विमाने येऊ शकतात. अन्य मोठ्या कंपन्यांची विमानसेवा सुरू झाली पाहिजे, याकरिता विमानतळ विस्तारीकरणासाठी तीन वर्षांपासून पाठपुरावा केला. 274 कोटींचा विस्तारीकरणाचा आराखडा 18 आक्टोबर 2016 रोजी विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष गुरूप्रसाद मोहापात्रा यांच्यासमोर सादर केला, तो तत्त्वत: मंजूरही झाला. त्याचवेळी या आराखड्यापैकी 30 टक्के हिस्सा राज्य सरकार देईल, असे पत्रही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राधिकरणाकडे सुुपूर्द केले. यामुळे पुढील कार्यवाहीला गती आली.

विस्तारीकरणात एटीसी टॉवर, पार्किंग हब, धावपट्टी वाढवणे, धावपट्टीची सुरक्षा, अग्‍निशमन यंत्रणा, सुरक्षेच्या द‍ृष्टीने नवीन प्रवेशद्वार, इमर्जन्सी एक्हिट, प्रपोशन अ‍ॅप्रोच पाथ इंडिकेटर, रनवे एंड सेफ्टी एरिया आदी कामे करण्यात येणार आहेत. यानंतर अन्य कंपन्यांची मोठी विमानांचीही वाहतूक सुरू होईल, असा विश्‍वासही त्यांनी या पत्रकाद्वारे व्यक्‍त केला आहे.