Sat, Jul 11, 2020 17:29होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात दिवसभरात १७ रुग्णांची भर; बाधितांचा आकडा २७७ वर

कोल्हापुरात दिवसभरात १७ रुग्णांची भर; बाधितांचा आकडा २७७ वर

Last Updated: May 23 2020 8:01PM

संग्रहित छायाचित्रकोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापुरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. आज (दि.२३) सायंकाळी ७ पर्यंत १७ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या २७७ वर पोहोचली आहे. 

आजरा तालुक्यातील श्रृंगारवाडी येथे शनिवारी नव्याने पुन्हा दोन रुग्ण सापडले. यापुर्वी एकजण पॉझिटिव्ह सापडला होता. त्यामुळे आता श्रृंगारवाडी येथे कोरोनाबाधितांची संख्या ३ तर तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या १५ झाली आहे. यापुर्वीच तालुका प्रशासनाने श्रृंगारवाडी गावच्या चारही सीमा बंद केल्या आहेत.

पाटगाव (ता.भुदरगड) येथे विरार वरून आलेल्या आणखी एका 32 वर्षीय तरुणाचा अहवाल शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या तरुणासोबत सहा जणांनी विरारमधून कागलमार्गे गारगोटी असा प्रवास केला आहे. यामध्ये शिवडाव येथील दोन तरुणींचाही समावेश आहे. यापूर्वी गुरुवारी विरार वरून आलेली एक व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती.