Wed, Sep 26, 2018 08:28होमपेज › Kolhapur › शेअर गुंतवणूक नावाखाली 26 लाखांचा गंडा

शेअर गुंतवणूक नावाखाली 26 लाखांचा गंडा

Published On: Aug 20 2018 1:37AM | Last Updated: Aug 20 2018 1:14AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शेअर बाजारात गुंंतवणूक करून भरघोस नफा मिळवून देण्याच्या आमिषाने 26 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी महिलेेसह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रवीण गणपतराव पाटील (38, रा. जीवबानाना जाधव पार्क) यांनी करवीर पोलिसांत फिर्याद दिली. 

प्रवीण पाटील यांना 13 एप्रिल रोजी खुशी माहेश्‍वरी नामक महिलेने फोनवरून शेअर बाजारातील गुंतवणुकीची माहिती दिली. मध्य प्रदेशातील कंपनीत गुंतवणूक केल्यास नियमित ट्रेडिंगमध्ये येणारी मर्यादा टाळून अधिकवेळा  ट्रेडिंग करता येईल, असे सांगितले. प्रतिव्यवहार 100 रुपये असणारी फी हजार रुपयांमागे केवळ 10 रुपये आकारली जाईल, अशी बतावणी केली. यावर विश्‍वास ठेवून पाटील यांनी महिलेने दिलेल्या बँक खात्यावर 12 लाख रु. जमा केले. पैसे भरण्यात आलेली लिंकच चोरीस गेल्याचे सांगून, तिने अन्य एका पाटील नामक व्यक्तीशी संपर्क साधण्यास सांगितले. संबंधित व्यक्तीनेही पाटील यांच्याकडून वेळोवेळी रक्कम भरून घेतली. 13 एप्रिलपासून आजअखेर कंपनीच्या नावावर पाटील यांनी 26 लाख 19 हजार रुपये भरले. मात्र, कोणताही मोबदला मिळत नसल्याने फसवणूक झाल्याची फिर्याद प्रवीण पाटील यांनी दाखल केली.