Mon, Apr 22, 2019 03:55होमपेज › Kolhapur › हातकणंगले, शहापुरातील 24 सराईत तडीपार

हातकणंगले, शहापुरातील 24 सराईत तडीपार

Published On: Apr 12 2018 1:26AM | Last Updated: Apr 12 2018 12:32AMकोल्हापूर : प्रतिनिधी

फाळकूट गुंडांची दहशत मोडून काढण्यासाठी हातकणंगले व शहापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. हणमंत जाधव व दस्तगीर महालिंगपुरे टोळीतील 24 जणांना बुधवारी कोल्हापूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. पोलिस अधीक्षकांनी ही कारवाई केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शिव जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर सराईत टोळ्यांविरुद्ध पोलिस दलाने कारवाईची मोहीम सुरू केल्याने सराईत टोळ्यांची पळापळ सुरू झाली आहे. गेल्या पंधरवड्यात 165 पेक्षा अधिक सराईतांवर बडगा उगारण्यात आलेला असतानाच बुधवारी एका दिवसात 24 जणांना तडीपार करण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना होय.

तडीपार झालेल्यांची नावे पुढील प्रमाणेः टोळीचा म्होरक्या हणमंत निवृत्ती जाधव (रा. इचलकरंजी), संदीप कोरवी, जयसिंग माछरे, अजय खामकर, सुरेश रणदिवे, शशिकांत जाधव, विलास सूर्यवंशी, सुरेश बगाडी, अक्षय भोसले, लाला कुशवाह, नूरमहमंद ऊर्फ समीर मुल्ला, प्रवीण कांबळे, सुधाकर हेरवाडे, झाकीरहुसेन शेख.

म्होरक्या दस्तगीर हसन महालिंगपुरेसह साथीदार अजित मोरे, विवेक लोहार, किरण भंडारी, भगवान शेटे, संदीप भेंडगुले, गजानन काकडे, राकेश गायकवाड, संतोष कुपटे, शशिकांत पाटील यांचा समावेश आहे.असे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी सांगितले. महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951चे कलम 55 अन्वये पोलिस अधीक्षक मोहिते यांनी ही कारवाई केल्याचे ते म्हणाले.