Thu, Jul 18, 2019 06:11होमपेज › Kolhapur › जिल्हा परिषदेतील तब्बल 2000 पदे रिक्त

जिल्हा परिषदेतील तब्बल 2000 पदे रिक्त

Published On: Jul 23 2018 1:08AM | Last Updated: Jul 22 2018 11:31PMकोल्हापूर : विकास कांबळे

जिल्हा परिषदेतील कारभार अगोदरच अधिकार्‍यांविना रामभरोसे सुरू असताना गेेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची संख्या वाढतच आहे. राज्य सरकारच्या वतीने करण्यात येणार्‍या भरतीसाठी संपूर्ण जिल्हा परिषदांकडून रिक्त पदांची माहिती मागितली आहे. जि.प.तील हे काम अंतिम टप्प्यात असून, सुमारे एक हजार पदे रिक्त असल्याचे दिसून आले. रिक्त पदांचा आकडा मंजूर पदे गृहीत धरून निश्‍चित करण्यात आला आहे. सरळ सेवेतून भरती करण्यात येणार्‍या पदांची संख्या साधारणपणे 600 इतकी आहे.

जिल्हा परिषदेतील कामाला होत असलेल्या विलंबाबाबत नेहमीच तक्रार होत असते. कर्मचारी जागेवर भेटत नाहीत, कामे वेळेवर होत नाहीत, यासंदर्भात अनेकवेळा जिल्हा परिषदेच्या सभागृहात चर्चाही झाली आहे. यावेळी कर्मचार्‍यांची संख्या अपुरी असल्याचे कारण सांगितले जाते. सध्या शासनाच्या बहुतेक कार्यालयांमध्ये कर्मचार्‍यांच्या रिक्त जागेचा प्रश्‍न अधिकार्‍यांना भेडसावत आहे. मात्र, जिल्हा परिषदेत रिक्त असणार्‍या जागांची संख्या मात्र थोडी अधिकच आहे हा आकडा जवळपास हजारात आहे. जिल्हा परिषदेत सर्वात मोठी अस्थापना असलेल्या शिक्षकांसह 11 हजार 394 पदे भरलेली
 आहेत. मंजूर पदाची संख्या गृहीत धरल्यास 1 हजार 15 पदे शिक्षकांची व 996 कर्मचार्‍यांची पदे रिक्त आहेत. यात सर्वात अधिक पदे आरोग्य विभागातील रिक्त आहेत. रिक्त असलेल्या एकूण आकड्यापैकी या विभागाीतल जवळपास निम्मी म्हणजे 551 पदे रिक्त आहेत. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाचा क्रमांक लागतो. या विभागातील 108 तसेच वित्त विभागातील 16, ग्रामपंचायत 42, कृषी 5, बांधकाम 55, पशुसंवर्धन 11 तर महिला व बालकल्याण विभागातील 40 पदे रिक्त आहेत. सहाय्यक शिक्षक, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक व प्रयोगशाळा सहाय्यक असे मिळून 1015 पदे शिक्षण विभागातील रिक्त आहेत.

शासनाच्या वतीने जंबो नोकर भरती करण्याचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी सर्व कार्यालयातून माहिती मागविण्यात आली आहे. माहिती पाठविण्याचे काम सुरू आहे. कोल्हापूर  जिल्हा परिषदेत सरळ सेवा भरतीने भरावयाची पदांची संख्या साधारणपणे 600 इतकी आहे.